• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
dnyanoba.com
Advertisement
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • नाशिक
  • राजकारण
  • गुन्हे वार्ता
  • व्हिडीओ
  • संपादकीय
    • ज्ञानोबा विशेष
  • आणखी
    • खाद्य संस्कृती
    • जॉब्स
    • आरोग्य
    • कृषी
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • नाशिक
  • राजकारण
  • गुन्हे वार्ता
  • व्हिडीओ
  • संपादकीय
    • ज्ञानोबा विशेष
  • आणखी
    • खाद्य संस्कृती
    • जॉब्स
    • आरोग्य
    • कृषी
    • शैक्षणिक
No Result
View All Result
dnyanoba.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम

PRATIK JOSHI by PRATIK JOSHI
June 10, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रीय
0
नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी स्तरावर मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision – SIR) घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

20 वर्षांनंतर ‘विशेष सखोल पुनरिक्षण‘

देशात यापूर्वी 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि शेवटचे 2002-2004 या वर्षांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते. गेल्या 20 वर्षांत केवळ दरवर्षी ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ घेतले गेले, परंतु सखोल पुनरिक्षण झाले नव्हते. या 20 वर्षांच्या काळात झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. अनेकांनी नवीन ठिकाणी नावे नोंदवली, मात्र जुन्या ठिकाणची नावे वगळली नाहीत; ज्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वाढली आहेत. ही दोषनिवारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

एक लाखाहून अधिक ‘बीएलओ‘ उतरणार मैदानात

राज्यातील संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी 1,00,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्याचे विशेष वेळापत्रक निश्चित केले आहे.

‘असे‘ असेल पुनरीक्षणाचे सविस्तर वेळापत्रक:

निवडणूक आयोगाने जाहीर केलेले अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • 20 ते 29 जून 2026:गणना अर्जांची छपाई आणि ‘बीएलओ’ (BLO) यांना प्रशिक्षण.
  • 30 जून ते 29 जुलै 2026: ‘बीएलओ’ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.
  • 5 ऑगस्ट 2026:प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी.
  • 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026:प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवणे.
  • 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत:प्राप्त दावे व हरकती निकालात काढणे.
  • 7 ऑक्टोबर 2026:अंतिम मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी.

घरोघरी जाऊन होणार ‘प्री-फिल्ड‘ प्रपत्रांचे वाटप

दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन (House to House visit) मतदारांना ‘प्री-फिल्ड’ (आधीच माहिती भरलेले) गणना प्रपत्र वाटप करतील. यात मतदाराची सध्याची माहिती असेल. तसेच संबंधित मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबांची 2002-2004 मधील जुन्या सखोल पुनरिक्षणातील माहिती आधीच भरलेली असेल किंवा मतदाराला ती स्वतः भरता येईल. मतदारांना आपले नवीन छायाचित्र देण्याची सुविधाही असेल. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास ‘बीएलओ’ किमान 3 वेळा संबंधित घराला भेट देतील व त्याची नोंद ठेवतील. मतदारांना हे प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 नागरिकत्व पडताळणी आणि आधारचा वापर

संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे व वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार व्यक्ती भारतीय नागरिक आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘आधार’ हे ओळख पुरावा म्हणून वापरले जाईल. तथापि, आधार ॲक्ट, 2026 च्या कलम 9 प्रमाणे आधारकार्ड हे ‘नागरिकत्वाचा पुरावा’ म्हणून मानले जाणार नाही.

 त्रुटी असल्यास मिळतील नोटीस

ज्या मतदारांच्या नोंदी जुन्या मतदार यादीशी जुळणार नाहीत किंवा त्यात त्रुटी असतील, अशा व्यक्तींना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा पाठवल्या जातील. तसेच अशा नावांची यादी संभाव्य कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय, तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. मतदारांना त्यांची 2002-2004 मधील माहिती आयोगाच्याhttps://voters.eci.gov.in/या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व नाव टाकून सहज मिळवता येईल.

 राजकीय पक्षांना ‘बीएलए‘ नेमण्याचे आवाहन

या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले ‘मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी’ (BLA) नियुक्त करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त 1,13,558 प्रतिनिधी नेमले आहेत. मतदार यादीतून दुबार व मृत व्यक्तींची नावे काढण्यासाठी राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन करण्यात आले असून यासाठी लवकरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित केली जाणार आहे. मतदार याद्या दोषविरहीत, अचूक व पारदर्शक करण्यासाठी आणि सर्व पात्र व्यक्तींचा समावेश करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Tags: nandurbar voter list nine crore election commission SIR
Previous Post

‘तो’ बिबट्याशी थेट भिडला! जळगावच्या माणसाने थेट बिबट्याला लोळवलं

PRATIK JOSHI

PRATIK JOSHI

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नाशिकमध्ये श्री चैतन्य पादुकांचे आगमन २५ मार्चला | घरी पूजनाची सुवर्णसंधी

नाशिकमध्ये श्री चैतन्य पादुकांचे आगमन २५ मार्चला | घरी पूजनाची सुवर्णसंधी

March 24, 2026
CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात आश्रम प्रकरण : दीड कोटी निधी देणाऱ्यांवर कारवाई करा – माजी आमदार अनिल गोटे

भोंदूबाबा अशोक खरात आश्रम प्रकरण : दीड कोटी निधी देणाऱ्यांवर कारवाई करा – माजी आमदार अनिल गोटे

March 30, 2026
खडसे पिता–पुत्री अडचणीत | जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक व ॲट्रासिटी गुन्हा दाखल

खडसे पिता–पुत्री अडचणीत | जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक व ॲट्रासिटी गुन्हा दाखल

March 30, 2026
“अजून पीडित महिला समोर येणार” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“अजून पीडित महिला समोर येणार” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

0
लिफेसत्याला : डिजिटल डिटॉक्स का आवश्यक आहे?

लिफेसत्याला : डिजिटल डिटॉक्स का आवश्यक आहे?

0
CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

0
नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

June 10, 2026
‘तो’ बिबट्याशी थेट भिडला! जळगावच्या माणसाने थेट बिबट्याला लोळवलं

‘तो’ बिबट्याशी थेट भिडला! जळगावच्या माणसाने थेट बिबट्याला लोळवलं

June 10, 2026
Dhule | लॉजिस्टिक पार्कसाठी जागेची लवकर निश्चिती करा – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

Dhule | लॉजिस्टिक पार्कसाठी जागेची लवकर निश्चिती करा – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

April 3, 2026
नाशिकचे नाट्यकलावंत उतरले मैदानात ‘नाट्यरसिक क्रिकेट लीग – NCL 2026’ उत्साहात संपन्न

नाशिकचे नाट्यकलावंत उतरले मैदानात ‘नाट्यरसिक क्रिकेट लीग – NCL 2026’ उत्साहात संपन्न

April 3, 2026

Recent News

© 2026 Dnyanoba News

No Result
View All Result

© 2026 Dnyanoba News