नाशिक
नाशिकमधील किम्स मानवता हॉस्पिटलच्या ‘किम्स कड्ल्स’ (Mother & Child Unit) मध्ये अत्याधुनिक LDRP (Labor, Delivery, Recovery, Postpartum) सूटचे उद्घाटन करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
LDRP सूट म्हणजे काय? मातांसाठी कसा फायदेशीर?
सामान्यतः प्रसूतीदरम्यान महिलांना लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी आणि पोस्टपार्टम या टप्प्यांसाठी वेगवेगळ्या विभागात हलवावे लागते. मात्र, LDRP सूटमुळे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.
यामुळे:
- रुग्णाचा ताण कमी होतो
- वारंवार स्थलांतराची गरज राहत नाही
- अधिक आरामदायी आणि सुरक्षित अनुभव मिळतो
- नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते
“मातृत्व हा भावनिक प्रवास” – डॉ. राज नगरकर
यावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नगरकर म्हणाले,
“आमच्यासाठी मातृत्व ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून एक आनंददायी आणि भावनिक प्रवास आहे. LDRP सूटमुळे मातांना सुरक्षित, सुसज्ज आणि स्ट्रेस-फ्री वातावरण मिळते. ICU, NICU आणि २४x७ तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हाय-रिस्क प्रेग्नंसीदेखील सुरक्षितपणे हाताळता येतात.”
गर्भवती महिलांसाठी मोफत मार्गदर्शन सत्रे
स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रणिता संघवी यांनी सांगितले की,
किम्स कड्ल्समध्ये दर महिन्याला मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते.
या सत्रांमध्ये:
- योग्य आहार व जीवनशैली
- पेनलेस डिलिव्हरी
- नवजात बाळाची काळजी
- स्तनपान मार्गदर्शन
यासोबतच ‘प्रेग्नेंसी मॉडिफाइड कपल झुंबा’ आणि डोहाळे जेवणासारखे उपक्रमही राबवले जातात. गेल्या ७ महिन्यांत १५०+ महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
२५० हून अधिक यशस्वी डिलिव्हरी; हाय-रिस्क केसेसमध्येही यश
गेल्या एका वर्षात किम्स कड्ल्समध्ये २५० हून अधिक यशस्वी प्रसूती पार पडल्या आहेत. यामध्ये:
- ट्विन प्रेग्नंसी
- IVF केसेस
- उच्च रक्तदाब व मधुमेह
- इतर गुंतागुंतीच्या हाय-रिस्क केसेस
अत्याधुनिक ICU, NICU, ब्लड बँक, रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी सुविधांमुळे हे यश शक्य झाले आहे.
महिलांसाठी आवाहन
हॉस्पिटलतर्फे महिलांना आवाहन करण्यात आले आहे की,
आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसूती अधिक सुरक्षित झाली आहे. त्यामुळे भीती न बाळगता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवावा.











